Exodus 3:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते वडीलधारे (पुढारी) तुझे एकतील मग तू व ते वडीलधारे (पुढारी) मिळून तुम्ही मिसरच्या राजाकडे जा व त्याला सांगा, ‘इब्री लोकांचा देव ‘याव्हे’ आम्हाकडे आला. व त्याने आम्हास वाळवंटात तीन दिवसांचा प्रवास करून जाण्यास व तेथे आमचा देव ‘याव्हे’ यासाठी बळी अर्पण करण्यास सांगितले आहे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे सांगणे ते ऐकतील; मग तू आणि इस्राएलाचे वडील जन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्याला सांगा, इब्र्यांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे; तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा, म्हणून आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“इस्राएलचे वडीलजन तुझा शब्द मानतील. मग तू आणि वडीलजन इजिप्तच्या राजाकडे जाऊन त्याला सांगा, याहवेह, इब्रींचे परमेश्वर, यांनी आम्हाला दर्शन देऊन सांगितले आहे की आम्ही तीन दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर रानात जाऊन याहवेह आमचे परमेश्वर यास यज्ञ अर्पण करावा म्हणून तू आम्हाला जाऊ दे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते तुझे ऐकतील, मग तू व इस्राएलाचे वडीलजन मिळून तुम्ही मिसराच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्री लोकांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे. आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी म्हणून आम्हांला तीन दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे.