Exodus 3:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव आहे.” देवाकडे पाहाण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आणखी म्हणाला, “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ते म्हणाले, “मी तुझ्या पूर्वजांचा परमेश्वर आहे, म्हणजे मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे.” तेव्हा मोशेने आपला चेहरा झाकला, कारण परमेश्वराकडे पाहण्यास तो घाबरला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकून घेतले. कारण देवाकडे पाहायला तो घाबरला.