Exodus 3:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणाला, “मिसरमध्ये माझ्या लोकांना कसा त्रास भोगावा लागत आहे; आणि मिसरच्या लोकांनी त्याचा कसा छळ चालविलेला आहे, हे मी पाहिले आहे; त्या लोकांच्या हाका मी ऐकल्या आहेत; लोकांचे हाल व दु:ख मला समजले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणाला, “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर याहवेहने त्याला सांगितले, “इजिप्त देशातील माझ्या लोकांचे हाल मी बघितले आहे. त्यांच्या मुकादमांच्या त्रासामुळे त्यांचे रडणे मी ऐकले आहे आणि त्यांच्या दुःखाविषयी मला चिंता आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर म्हणाला, “मिसरामध्ये माझ्या लोकांचा जाच मी खरोखर पाहिला आहे; आणि मुकादमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे; त्यांचे दु:ख मी जाणून आहे.