Exodus 3:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता मी खाली जाऊन माझ्या लोकांचा मिसरच्या लोकांपासून बचाव करीन; मी त्यांना ह्या देशातून काढून जेथे त्यांना कसलाही त्रास होणार नाही अशा चांगल्या देशात जेथे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी असे विविध प्रकारचे लोक राहतात, तेथे घेऊन जाईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून चांगल्या व विस्तीर्ण देशात, दूध व मध वाहत्या देशात घेऊन जाण्यासाठी मी खाली आलो आहे. त्या देशात कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी हे लोक राहतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.