Exodus 30:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये; सर्व जणांनी परमेश्वराला सारखेच अर्पण करावे; हे तुम्हाला आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्ताची खंडणी असे होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून परमेश्वरा-प्रीत्यर्थ हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलाहून अधिक देऊ नये आणि गरिबाने त्याहून कमी देऊ नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराकरता हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंत मनुष्याने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये;