Exodus 31:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या बरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; बाकीच्या कारागिरांना मी कौशल्य दिले आहे त्यामुळे ते सर्व मिळून मी तुला सांगितलेली सर्व कामे बरोबर करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि पाहा, त्याच्या जोडीला मी दानवंशीय अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याला नेमले आहे; एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या ह्रदयात मी बुद्धी ठेवली आहे; ती ह्यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्यात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे, त्याला मदत करण्यासाठी दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब याला मी नेमले आहे. “सर्व कुशल कामगारांना मी क्षमता दिली आहे, जेणेकरून तुला आज्ञापिलेले सर्वकाही त्यांनी करावे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्याबरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाखाचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; एवढेच नव्हे तर जेवढे म्हणून बुध्दिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुध्दी ठेवली आहे. ती यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी तयार कराव्या.