Exodus 32:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मोशे त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर काय म्हणतो ते मी तुम्हांस सांगतो, ‘प्रत्येक माणसाने आपली तलवार घ्यावी आणि छावणीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यत अवश्य जावे आणि प्रत्येक माणसाने आपला भाऊ, मित्र व शेजारी यांना अवश्य जिवे मारावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, ‘तुम्ही प्रत्येकाने आपल्या कंबरेस तलवार लटकवावी आणि छावणीच्या ह्या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत चहूकडे फिरून आपले बंधू, सोबती व शेजारी ह्यांचा वध करावा.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मोशे त्यांना म्हणाला, “याहवेह इस्राएलांचे परमेश्वर असे म्हणतात: ‘प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधावी. छावणीतून एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत फिरत, प्रत्येकाने आपला भाऊ आणि मित्र व शेजारी यांना जिवे मारून टाकावे.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मोशे त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर काय म्हणतो ते मी तुम्हास सांगतो, ‘प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकावावी आणि छावणीच्या या प्रवेशव्दारापासून त्या प्रवेशव्दारापर्यंत अवश्य जावे आणि प्रत्येक मनुष्याने आपला भाऊ, मित्र व शेजारी यांना अवश्य जिवे मारावे.”