Exodus 32:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांना सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काही तरी करून कदाचित् परमेश्वराकडून मला तुमच्या पापांची क्षमा मिळविता येईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुसर्या दिवशी मोशे लोकांना म्हणाला, “तुम्ही हे घोर पातक केले आहे, तरी मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो; कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्चित्त मला करता येईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग दुसर्या दिवशी मोशे लोकांना म्हणाला, “तुम्ही मोठे पाप केले आहे, पण आता मी वर याहवेहकडे जाईन; कदाचित मी तुमच्या पापासाठी प्रायश्चित करू शकेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांस सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काहीतरी करून कदाचित मला तुमच्या पापांचे प्रायश्चित करता येईल.”