Exodus 33:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्याप्रमाणे एखादा माणूस आपल्या मित्राशी बोलतो त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोरबोलत असे. परमेश्वराशी बोलल्यानंतर मोशे नेहमीआपल्या छावणीत माघारी जाई तरी मोशेचा मदतनीस. नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे परत जात असे, तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसा एखादा व्यक्ती आपल्या मित्राशी बोलतो तसे याहवेह मोशेशी समोरासमोर बोलत असत. मग मोशे छावणीकडे परत जात असे, परंतु त्याचा तरुण सहकारी, नूनाचा पुत्र यहोशुआ हा मंडप सोडून जात नसे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.