Exodus 34:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या तुटलेल्या दोन पाट्याप्रमाणे आणखी दोन दगडी पाट्या तयार कर म्हणजे पहिल्या दोन पाट्यांवर लिहिलेलीच अक्षरे मी त्या पाट्यांवर लिहीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवून तयार कर म्हणजे तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्यांच्यावर लिहीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याहवेह मोशेला म्हणाले, “पहिल्या पाट्यांसारख्याच दोन दगडी पाट्या तू घडव, मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होते ते मी त्यावर लिहेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या दोन पाट्यांप्रमाणे आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार कर म्हणजे फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्याच्यावर लिहीन.