Exodus 34:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तुझ्या देशात जाशील तेव्हा तुझ्या शत्रुंना मी तुझ्या देशातून घालवून देईन; मी तुझ्या देशाच्या सीमा वाढवीन; आणि वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वरासमोर हजर राहावयास जाशील त्यावेळी तुझ्यापासून तुझ्या देश घेण्याचा कोणीही प्रयत्न करणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तर परराष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देईन व तुझी सरहद्द वाढवीन; वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर हजर होण्यास जाशील तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी सर्व राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून टाकीन आणि तुमची सीमा वाढवेन आणि जेव्हा तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यासमोर हजर होण्यासाठी जाल, त्यावेळी इतर कोणीही तुमच्या देशाचा लोभ धरणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तर परराष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देईन; मी तुझ्या देशाच्या सीमा वाढवीन; आणि वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यामोर हजर राहायला जाशील त्या वेळी तुझ्या देशाचा कोणीही लोभ धरणार नाही.