Exodus 34:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझ्याबरोबर कोणालाही चढून वर येण्याची परवानगी नाही; पर्वतावरील कोणत्याच ठिकाणी कोणी माणूस देखील दिसू नये; तसेच तुझ्या जनावरांच्या खिल्लारांना व मेंढ्यांच्या कळपांना पर्वताच्या पायध्याशी देखील चरु देऊ नयेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्याबरोबर कोणीही वर चढून येऊ नये, सगळ्या पर्वतावर कोणी मनुष्य दिसता कामा नये, तसेच शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या कडेला चरू देऊ नये.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्याबरोबर कोणीही येऊ नये किंवा डोंगरावर कुठेही इतर कोणी दृष्टीस पडू नये; गुरे आणि शेरडेमेंढरे यांनी सुद्धा डोंगरासमोर चरू नये.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्याबरोबर कोणी चढून वर येऊ नये पर्वतावरील कोणत्याच ठिकाणी कोणी मनुष्य दिसू नये; तसेच शेरडेमेंढरे कळप व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या पायथ्याशी चरू देऊ नकोस.”