Exodus 34:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहात तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो बोलावयास पुन्हा परमेश्वराकडे जाईपर्यंत आपला चेहरा झाकून ठेवी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहत तेव्हा त्याच्या चेहर्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; परमेश्वराशी संभाषण करण्यास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएली लोकांनी पाहिले की मोशेचा चेहरा तेजस्वी होता. मग मोशे याहवेहबरोबर बोलावयास जाईपर्यंत आपल्या चेहर्यावर पडदा परत घालत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहत तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो परमेश्वराकडे बोलावयास आत जाईपर्यंत तो आपला चेहरा झाकून ठेवत असे.