Exodus 35:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर ज्या लोकांना मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळया सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रासाठी परमेश्वराला अर्पणे आणली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ज्यांची इच्छा असेल व ज्यांच्या हृदयाला स्फूर्ती मिळाली त्यांनी सभामंडपाच्या कामासाठी व त्याच्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांची अर्पणे याहवेहसाठी आणली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर ज्यांच्या अंतःकरणांत स्फूर्ती झाली, त्या सर्वांनी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्रांसाठी परमेश्वरास अर्पणे आणली.