Exodus 36:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्या कसबी कारागिरांनी पवित्र निवास मंडप बांधण्याचे काम सुरु केले; त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचे दहा पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी, पसरलेल्या पंखाच्या, करुब दूतांची चित्रे शिवली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यामध्ये जे बुद्धिमान पुरुष काम करीत होते त्या सर्वांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनवला; हे पडदे त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार केले व त्यांवर कुशल कारागिराकडून करूब काढवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व कुशल कारागिरांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार केला व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या कसबी कारागिरांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनविला. त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी कुशल कारागिराकडून करुब काढले.