Exodus 37:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने बाभळीच्या लाकडाची एक चौरस वेदी केली; ती अठरा इंच लांब, अठरा इंच रुंद व छत्तीस इंच उंच होती; वेदीवर प्रत्येक कोपऱ्याला एक याप्रमाणे चार शिंगे होती. ती वेदीला अशी जोडली होती की वेदी व शिंगे एका अखंड तुकड्याची बनविलेली दिसत होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने बाभळीच्या लाकडांची धूपवेदी केली; तिची लांबी एक हात व रुंदी एक हात अशी ती चौरस होती. तिची उंची दोन हात होती व तिची शिंगे अंगचीच होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्यांनी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार केली. ती चौरस होती. तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात होती व तिची शिंगे तिच्याशी अखंड अशी होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली; ती एक हात लांब, एक हात रुंद व दोन हात उंच अशी चौरस होती; तिची शिंगे अंगचीच होती.