Exodus 38:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो पडदा पितळेच्या चार खुर्च्या असलेल्या चार खांबावर अधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनविलेल्या होत्या; खांबाची वरची टोके चांदीने मढविली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे खांब चार आणि त्यांच्यासाठी पितळेच्या उथळ्या चार होत्या; त्यांच्या आकड्या चांदीच्या असून त्यांचे मथळे चांदीने मढवले होते व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला चार खांब व कास्याच्या चार बैठका होत्या. त्यांच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या आणि त्याच्या वरच्या भागाला चांदीचे आवरण दिले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो पडदा पितळेच्या चार उथळ्या आणि चार खांबावर आधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनवलेल्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढवली होती.