Exodus 38:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि प्रत्येकाला एक बेका चांदी (म्हणजे पवित्र स्थानाच्या अधिकृत मापाप्रमाणे “अर्धा शेकेल” चांदी) कर म्हणून द्यावी लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणजे जितके वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची गणती झाली तेव्हा, ते सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरले. त्यांतल्या प्रत्येकामागे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलना-प्रमाणे एकेक बेका म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जनगणना झालेले वीस वर्ष व त्याहून अधिक वयाचे सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास पुरुष होते—त्याचा प्रत्येक पुरुषाकरिता एक बेका, म्हणजेच पवित्रस्थानाच्या वजनानुसार अर्धा शेकेल मिळाला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येका मनुष्यामागे एक बेका चांदी म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.