Exodus 38:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने वेदीसाठी पितळेची पडद्यासारखी जाळी बनविली व ती वेदी भोवतीच्या काठाखाली अशी बसवली की ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेदीला त्याने सभोवती कंगोर्याच्या खाली पितळेच्या जाळीची एक चाळण बनवली; ती वेदीच्या खालच्या बाजूने अर्ध्या उंचीपर्यंत होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी वेदीसाठी कास्याच्या जाळीची चाळण तयार केली, जी वेदीच्या काठाखाली वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने वेदीला सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेची जाळी बनवली, ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली.