Exodus 38:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची पन्नास वार लांबीची एक कनात त्याने केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाचे विणलेले पडदे जोडून एक कनात केली, तिची लांबी शंभर हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्यांनी अंगण तयार केले. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब होती व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची लांबी शंभर हात होती.