Exodus 39:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी नंतर न्यायाच्या ऊरपटाच्या गोल कड्या एफोदाच्या गोल कड्यांनी निव्व्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो एफोदावर घट्ट बसावा; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने अशा बांधल्या की, कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर तो राहावा आणि एफोदावरून ऊरपट सरकू नये; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने कमरबंदाला अशा बांधाव्या की ऊरपट एफोदावरून सरकणार नाही; हे त्यांनी याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो ऊरपट एफोदावरून घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.