Exodus 4:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु मोशे परमेश्वराला म्हणाला, “परंतु परमेश्वरा मी तुला खरे ते सांगतो; मी काही चांगला वक्ता नाही; मला लोकांसमोर कधीही नीट बोलता आलेले नाही. आणि आता तुझ्याबरोबर बोलल्यानंतरही नाही. तुला माहीत आहे की मी सावकाश व अडखळत बोलतो आणि बोलताना मला योग्य, परिणामकारक शब्द सापडत नाहीत;”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, “हे प्रभू, मी बोलका नाही; पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे याहवेहला म्हणाला, “आपल्या सेवकास क्षमा करावी, प्रभू मी चांगला वक्ता नाही, कधीही नव्हतो आणि आपण माझ्याबरोबर प्रत्यक्ष बोलत होता तेव्हाही नाही. मी मुखदुर्बल व जिभेचा जड आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “परंतु हे प्रभू, मी तुला खरे ते सांगतो; मी काही बोलका नाही; मी पूर्वीही नव्हतो आणि आता तुझ्याबरोबर बोलल्यानंतरही नाही. तुला माहित आहे की मी तर मुखाचा व जिव्हेचाही जड आहे.”