Exodus 4:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो इथ्रोला म्हणाला, “मला मिसरला माझ्या भाऊबंदाकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.” इथ्रो म्हणाला, “तू शांततेने जा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथ्रो ह्याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, “मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदांकडे परत जाऊ द्या आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू द्या.” तेव्हा इथ्रो मोशेला म्हणाला, “सुखाने जा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मोशे आपला सासरा इथ्रोकडे गेला आणि त्याला म्हणाला, “इजिप्त देशात असलेल्या माझ्या स्वकियांकडे परत जाऊन त्यातील कोणी जिवंत आहेत की नाही ते मला पाहू दे.” इथ्रोने उत्तर दिले, “जा. तुझे भले होवो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो त्यास म्हणाला, “मला मिसरातील माझ्या भाऊबंदांकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.” इथ्रो मोशेला म्हणाला, शांतीने जा.