Exodus 4:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने अहरोनाला सांगितले होते, “तू वाळवंटात जाऊन मोशेला भेट,” म्हणून अहरोन देवाच्या डोंगरावर म्हणजे होरेब किंवा सिनाय डोंगरावर जाऊन मोशेला भेटला. मोशे भेटल्यावर अहरोनाने त्याचे चुंबन घेतले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “मोशेला भेटण्यास तू रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर त्याला भेटून त्याने त्याचे चुंबन घेतले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता याहवेहने अहरोनाला म्हटले, “मोशेला भेटण्यासाठी रानात जा.” तेव्हा अहरोन मोशेला परमेश्वराच्या पर्वतावर भेटला आणि त्याचे चुंबन घेतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वराने अहरोनाला सांगितले, “मोशेला भेटायला रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर जाऊन मोशेला भेटला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.