Exodus 4:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी तुला आणखी एक चिन्ह किंवा पुरावा देतो. तू तुझा हात झग्याच्या आत तुझ्या छातीवर ठेव” तेव्हा मोशेने आपला हात झाग्याच्या आत आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा त्यावर बफर्सारखे पांढरे डाग दिसले; असा त्याचा हात बदलून गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने त्याला आणखी सांगितले, “आता आपला हात छातीवर ठेव.” त्याने हात छातीवर ठेवून बाजूला काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याहवेह त्याला म्हणाले, “तुझा हात तुझ्या झग्याच्या आत घाल.” मग मोशेने आपला हात आपल्या झग्याच्या आत घातला आणि जेव्हा त्याने हात बाहेर काढला, त्याची कातडी कोडाने भरली; तो हिमासारखा पांढरा झाला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वर त्यास आणखी म्हणाला, “तू तुझा हात तुझ्या छातीवर ठेव,” तेव्हा मोशेने आपला हात आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला;