Exodus 5:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
फारोने उत्तर दिले, “तुम्ही लोक आळशी आहा. तुम्हाला काम करायला नको आणि म्हणूनच तुम्हाला जाऊ देण्याविषयी तुम्ही मला विचारता आणि त्या करिताच तुम्हाला येथून निघून जायला आणि तुमच्या परमेश्वराला यज्ञ करावयास पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात आळशी, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला जाऊ द्यावे, आमच्या परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला यज्ञ करू द्यावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फारोहने उत्तर दिले, “तुम्ही आळशी लोक आहात—आळशी! म्हणून तुम्ही म्हणता, ‘आम्हाला याहवेहपुढे यज्ञ करावयास जाऊ द्यावे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फारो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला परमेश्वरास यज्ञ करायला जाऊ देण्याची परवानगी दे.