Exodus 5:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तरी परंतु पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनविल्या पाहिजेत. ते आळशी झाले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या देवाला यज्ञ करण्यासाठी त्यांना जाऊ देण्याविषयी ते मला विचारत आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी आजवर जेवढ्या विटा त्यांना कराव्या लागत होत्या तेवढ्या त्यांच्याकडून करवून घ्या, त्यात काही कमी करू नका; ते आळशी आहेत, म्हणून ते ओरड करीत आहेत की आम्हांला जाऊ द्या, आमच्या देवाला यज्ञ करू द्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीही पूर्वी ते जितक्या विटा तयार करीत होते तितक्या त्यांनी केल्याच पाहिजे; त्यात घट होऊ नये. ते आळशी आहेत; म्हणूनच, ‘आम्हाला रानात जाऊन आमच्या परमेश्वराला यज्ञ करू दे,’ अशी ओरड करीत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हांला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे.