Exodus 6:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला आणि त्याने त्यांना इस्राएल लोकाकडे जाऊन त्यांच्याशी बोलण्याची, तसेच फारोकडे जाऊन त्याच्याशी बोलणी करण्याची आणि इस्राएल लोकांना मिसर मधून बाहेर घेऊन जाण्याची आज्ञा दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांच्याशी बोलला; मिसर देशातून इस्राएल लोकांना बाहेर नेण्यासाठी त्याने त्यांना इस्राएल लोकांसंबंधी आणि मिसराचा राजा फारो ह्यांच्यासंबंधी आज्ञा केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने मोशे व अहरोन यांना इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर नेण्याविषयी आज्ञा देऊन इस्राएल लोकांकडे आणि तसेच मिसरी राजा फारो याच्याकडे पाठवले.