Exodus 7:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मोशे व अहरोन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे फारोकडे गेले. अहरोनाने आपली काठी जमिनीवर टाकली. तेव्हा फारो व त्याचे सेवक यांच्या देखत त्या काठीचा साप झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मोशे व अहरोन ह्यांनी फारोजवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक ह्यांच्यापुढे टाकली तेव्हा तिचा साप झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व याहवेहने त्यांना सांगितल्याप्रमाणेच केले. अहरोनाने आपली काठी फारोहसमोर व त्याच्या सेवकांसमोर खाली जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मोशे व अहरोन फारोकडे गेले आणि परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्यापुढे टाकली आणि त्या काठीचा साप झाला.