Exodus 7:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर मोशेला म्हाणाला, “आपली काठी मिसरमधील नद्या, नाले, तलाव व जेथे पाणी भरून ठेवतात त्या जागेवर उगारण्यास अहरोनास सांग म्हणजे त्याने तसे केल्यावर सर्व पाण्याचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात भरलेल्या पाण्याचे देखील रक्त होईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “तू अहरोनाला सांग की, ‘आपली काठी घेऊन मिसर देशात जितके पाणी म्हणून आहे म्हणजे त्यातल्या नद्या, नाले, तलाव व हौद ह्या सर्वांवर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांच्या पाण्याचे रक्त बनेल; आणि मिसरातील काष्ठपाषाणांच्या सर्व पात्रांत रक्तच रक्त होईल.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन, इजिप्तचे पाणी म्हणजेच नद्या, नाले, तलाव व सर्व तळे यावर आपला हात लांब कर; आणि त्याचे रक्त होईल’ इजिप्तमध्ये सर्वत्र, लाकडी भांड्यात व दगडी पात्रात सुद्धा रक्त असेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अहरोनाला सांग की, आपली काठी घेऊन मिसर देशामधील नद्यांवर, नाल्यावर, त्यांच्या तलावावर व त्यांच्या सर्व पाण्याच्या तळ्यावर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात रक्तच रक्त होईल.”