Exodus 8:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर तसेच करण्याचा प्रयत्न केला परंतु धुळीतून त्यांना उवा बनविता आल्या नाहीत; त्या उवा पशूवर व लोकांच्या अंगावर राहिल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उवा उत्पन्न करण्यासाठी जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना; मनुष्य व पशू उवांनी भरून गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जेव्हा जादूगारांनी आपल्या गुप्तज्ञानाने तसेच करण्याचा प्रयत्न केला, ते करू शकले नाही. कारण सगळीकडे लोकांवर व जनावरांवर चिलटे आली होती,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर उवा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना धुळीतून उवा बनविता आल्या नाहीत; पशू व मनुष्य उवांनी भरून गेले.