Exodus 8:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ; आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्याकडे जा. त्याला असे सांग की परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की, “पहाटेस ऊठ आणि जाऊन फारोपुढे उभा राहा; तो त्या वेळी नदीवर येईल; तू त्याला सांग, ‘परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यांना जाऊ दे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “पहाटे ऊठ व फारोह नदीवर जात असता त्याची भेट घे आणि त्याला सांग याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्यापुढे उभा राहा. त्यास असे सांग की परमेश्वर म्हणतो, माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांस जाऊ दे.