Exodus 8:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु मी इस्राएल लोकांशी मिसरच्या लोकांप्रमाणे वागणार नाही. तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात तेथे एकही गोमाशी असणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला समजेल की मी परमेश्वर या पृथ्वीवर आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या दिवशी अलग ठेवीन; गोमाश्यांचे थवे तेथे जाणार नाहीत, ह्यावरून पृथ्वीवर मी परमेश्वर आहे हे तुला कळेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पण त्या दिवशी माझे लोक राहतात त्या गोशेन प्रांताशी मी वेगळा वागेन; त्या ठिकाणी मात्र गोमाश्यांचे थवे नसतील, यावरून तुला समजावे की, मी याहवेह या भूमीवर आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात, तो मी त्या दिवशी वेगळा करीन, तेथे गोमाश्यांचे थवे जाणार नाहीत. यावरुन पृथ्वीवर मीच परमेश्वर आहे हे तुला समजेल.