Exodus 8:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोशे म्हणाला, “पाहा, मी जातो आणि तुझ्यापासून, तुझे लोक व सेवक या सर्वापासून उद्या गोमाशा दूर करण्याकरिता परमेश्वराला विंनती करतो परंतु यज्ञकरण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांना तुम्ही अडवू नये.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करतो की, फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा ह्यांच्यावरील गोमाश्यांचे थवे उद्या निघून जावेत; मात्र परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यास लोकांना जाऊ न देण्यासंबंधी फारोने पुनरपि वंचना करू नये.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे त्याला म्हणाला, “मी तुला सोडून गेल्याबरोबर याहवेहकडे तुझ्यासाठी विनंती करेन, आणि उद्या गोमाशा फारोहस व त्याच्या अधिकार्यांस व त्याच्या लोकास सोडून जातील. लोकांनी याहवेहला यज्ञ करण्यास जाऊ नये म्हणून फारोहने पुन्हा फसवणूक करू नये याची त्याने दक्षता घ्यावी.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि फारो व त्याचे सेवक या सर्वांपासून उद्या गोमाशांचे थवे दूर करण्याकरिता परमेश्वरास विनंती करतो. परंतु परमेश्वरासाठी यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांस तुम्ही पुन्हा फसवू नये.”