Exodus 8:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नाईल नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत. बिछान्यात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, भट्ट्यात पाण्यांच्या भांड्यात येतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नील नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल आणि तुझ्या वाड्यात, तुझ्या निजण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकरनोकरांच्या घरांत, तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्यांत आणि काथवटींत बेडूकच बेडूक होतील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाईल नदी बेडकांनी भरून जाईल. ते तुझ्या महालात व तुझ्या शयनगृहात, तुझ्या अंथरुणात येतील, तुझ्या अधिकार्‍यांच्या घरात आणि तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्या व तुझ्या परातीत ते येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत, अंथरुणात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत येतील.