Exodus 9:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हा देवाकडून झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला! हे वादळ थांबविण्यास देवाकडे विनंती करा आणि मग मी तुम्हाला जाऊ देतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही परमेश्वराची विनवणी करा; ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे तेवढी पुरे, मी तुम्हांला जाऊ देतो; तुम्हांला इतःपर राहायला नको.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहला विनंती करा, कारण मेघांचा हा गडगडाट व गारा आता असह्य झाले आहे. मी तुम्हाला जाऊ देईन व तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही परमेश्वराकडे विनवणी करा. हा झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला तेवढे पुरे, मी तुम्हास जाऊ देतो. तुम्ही यापुढे राहणार नाही.”