Exodus 9:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तर शेतावरील पशूंविरुद्ध परमेश्वर आपल्या सामर्थ्याचा वापर करील. परमेश्वर तुझे घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरे यांना भयंकर आजाराने त्रस्त करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडेमेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल; भयंकर मरी उद्भवेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर शेतातील तुमची जनावरे—घोडे, गाढवे, उंट व शेळ्यामेंढ्यांचे कळप यांच्यावर याहवेहचा हात भयानक पीडा आणेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरांचे कळप, ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल.