Ezekiel 1:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक प्राण्याला चार तोंडे होती. प्रत्येकाचे समोरचे तोंड माणसाचे होते. उजव्या बाजूला सिंहाचे, डाव्या बाजूला बैलाचे व मागच्या बाजूला गरुडाचे तोंड होते. ते चारहीजण दिसायला अगदी सारखे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या चौघांच्या मुखांपैकी एक मुख मनुष्याचे होते, त्या चौघांचे उजव्या बाजूचे एक मुख सिंहाचे होते; त्या चौघांचे डाव्या बाजूचे एक मुख बैलाचे होते; आणि त्या चौघांचे एक मुख गरुडाचेही होते, अशी त्यांची मुखे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांची मुखे अशा प्रकारे दिसत होती: प्रत्येकाला एक मानवी मुख होते, प्रत्येकाच्या उजव्या बाजूचे मुख सिंहाचे होते, आणि डावीकडील मुख बैलाचे होते; प्रत्येकाला गरुडाचे मुख सुद्धा होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या चौघांच्या मुखापैकी एकाचे मुख मनुष्याच्या तोंडासारखे दिसत होते, दुसऱ्याचे मुख सिंहाच्या तोंडासारखे, तिसऱ्याचे मुख बैलासारखे आणि चौथ्याचे मुख गरुडाच्या तोंडासारखे होते.