Ezekiel 1:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते प्राणी पंखांचा उपयोग स्वत:ला झाकण्यासाठी करीत. दोन पंखांनी ते जवळ असलेल्या प्राण्याला स्पर्श करीत. ते दोन पंखांनी अंग झाकीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वरच्या अंगी त्यांची मुखे व त्यांचे पंख विभक्त होते. प्रत्येकाचे दोन पंख जवळील दुसर्याच्या एकेका पंखाला लागले होते; आणि प्रत्येकाच्या दोन-दोन पंखांनी त्यांचे शरीर आच्छादले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशाप्रकारे त्यांची मुखे होती. प्रत्येकाचे वरच्या बाजूने पसरलेले पंख होते जे त्यांच्या बाजूला असलेल्या प्राण्याच्या पंखाला स्पर्श करीत होते; आणि प्रत्येकाला आणखी दोन पंख होते ज्यांनी त्यांचे अंग झाकले जाई.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांची मुखे अशाप्रकारची होती आणि त्यांचे पंख एकमेकापासून वेगळे होते, प्रत्येक प्राण्याचे पंख दुसऱ्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करत होते.