Ezekiel 1:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी त्याचा कमरेवरचा भाग पाहिला. तो तप्त धातू प्रमाणे दिसत होता. त्याच्या भोवती आगीचा लोळ असल्याप्रमाणे दिसत होते. मी त्याच्या कमरेखालच्या भागाकडे पाहिले. तो आगीप्रमाणे दिसत होता. त्याच्या सभोवती प्रभा फाकली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा अग्नीचा भास मला झाला; त्याच्या कंबरेपासून वर व त्याच्या कंबरेपासून खाली अग्नीचा भास मला झाला व त्यांच्याभोवती प्रभा चमकत होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा कमरेसारखा दिसणारा वरचा भाग चकाकत्या धातूसारखा, जणू काही अग्नीने प्रज्वलित झाला होता आणि कमरेपासून खालचा भाग अग्नीसारखा होता; आणि त्याच्याभोवती अप्रतिम प्रकाश झळकत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा प्रकाश मी पाहिला, त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास झाला, व त्याच्या भोवती प्रभा चमकत होती.