Ezekiel 10:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग करुबांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. मी त्यांना मंदिर सोडून जाताना पाहिले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली मग ते देवाच्या मंदिराच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी थांबले. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्या वरच्या बाजूला होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निघतेवेळी करूबांनी आपले पंख उचलले व ते माझ्यादेखत भूमीवरून वर चढून गेले; त्यांच्याबरोबर चाकेही गेली; ते परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वद्वारापुढे थांबले; त्यांच्यावर इस्राएलाच्या देवाचे तेज होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पाहत असता, करुबांनी आपली पंखे पसरली आणि जमिनीवरून उठले, ते पुढे जात असता, चाकेही त्यांच्याबरोबर गेली. ते याहवेहच्या भवनाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे थांबले, आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा करुबाने त्याचे पंख उंच केले आणि माझ्या देखत ते पृथ्वीवरून उडाले, त्यांची चाकेही त्यांच्या बाजूला होती. परमेश्वर देवाच्या पूर्व प्रवेशव्दाराजवळ येऊन उभे झाले आणि मग इस्राएलाच्या देवाचे गौरव त्यांच्यावर वरुन खाली आले.