Ezekiel 10:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग एका करुबाने हात लांब करुन, त्यांच्यामधील काही धगधगते निखारे उचलले आणि त्या माणसाच्या हाती दिले. मग तो माणूस निघून गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्या करूबांमधल्या एकाने आपला हात लांबवून करूबांमधल्या विस्तवास तो लावला; त्याने त्यातून काही इंगळ घेऊन तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याच्या हातात दिले; तो ते घेऊन निघून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा करुबातील एकाने त्यांच्यामध्ये जो अग्नी होता त्याकडे आपला हात लांब केला. त्याने त्यातील काही इंगळ घेतले व तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाच्या हातात ठेवले, त्याने ते घेतले आणि बाहेर गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एका करुबाने इतर करुबीमांच्यामध्ये जेथे आग आहे, तेथे आपला हात लांब केला आणि ती आग उचलून तागाचे वस्त्र घातलेल्या पुरुषाच्या हाती दिली. तो पुरुष ती आग घेवून तेथून निघून गेला.