Ezekiel 11:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग वाऱ्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्व-द्वाराजवळ नेले. ह्या दाराचे तोंड उगवतीला होते. त्या प्रवेशद्वाराच्या तोंडाशी मी पंचवीस लोकांना पाहिले. त्यांत अज्जूरचा मुलगा याजन्या आणि बनायाचा मुलगा पलट्या हेही होते. हे लोकांचे नेते होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आत्म्याने मला उचलून घेऊन परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वाभिमुख पूर्वेकडील द्वाराकडे आणले; तेव्हा पाहा, वेशीपुढे पंचवीस इसम होते; त्यांच्यामध्ये याजन्या बिन अज्जूर व पलट्या बिन बनाया हे लोकनायक माझ्या दृष्टीस पडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर आत्म्याने मला उचलून याहवेहच्या मंदिराच्या पूर्वेकडील द्वाराजवळ आणले. तिथे द्वाराच्या प्रवेशाकडे पंचवीस पुरुष होते आणि त्यांच्यामध्ये लोकांचे पुढारी अज्जूरचा पुत्र याजन्याह व बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह यांना मी पाहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर परमेश्वर देवाच्या घराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे देवाच्या आत्म्याने मला उचलून नेले. आणि पहा! प्रवेशद्वाराजवळ मी पंचवीस माणसे उभी असलेली पाहिली. त्यांच्यामध्ये अज्जूरचा मुलगा याजन्या आणि पलट्या मुलगा बनाया, हे लोकांचे पुढारी त्यांच्यामध्ये होते.