Ezekiel 11:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मानवपुत्रा, हा देश ज्यांना सक्तीने सोडावा लागला त्या इस्राएलच्या कुटुंबीयांचे, तुझ्या भाऊबंदाचे स्मरण कर. ते येथून दूर असलेल्या देशात राहतात. पण मी त्यांना परत आणीन. पण यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणतात, ‘परमेश्वरापासून दूर राहा ही भूमी आम्हाला दिलेली आहे ती आमची आहे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मानवपुत्रा, जे यरुशलेमनिवासी, ‘परमेश्वरापासून दूर राहा, आम्हांलाच देश वतन मिळाला आहे,’ असे म्हणतात ते तुझे भाऊबंद, तुझे भाऊबंदच, तुझे आप्तजन, इस्राएलाचे सबंध घराणे आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मानवपुत्रा, यरुशलेमचे लोक तुमच्या निर्वासित भाऊबंदांविषयी व इतर सर्व इस्राएली लोकांविषयी म्हणाले, ‘ते याहवेहपासून फार दूर आहेत; हा देश आम्हाला आमचे वतन म्हणून दिला गेला होता.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मानवाच्या मुला, जे यरूशलेमनिवासी, तुझे भाऊबंद, तुझे भाऊबंदच, इस्राएल घराण्यातील प्रत्येक मानवाचे वंशज. जे सांगतात इस्राएल देश आम्हास मिळाला आहे, ते परमेश्वर देवापासून लांब आहेत, ही भूमी आम्हास वतन म्हणून दिलेली आहे.