Ezekiel 12:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो पळून जायचा प्रयत्न करील पण मी (देव) त्याला पकडीन. तो माझ्या सापळ्यात अडकला जाईल. मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात आणीन. पण त्याला कोठे नेले जात आहे, हे तो पाहू शकणार नाही. शत्रू त्याचे डोळे काढून त्याला आंधळा करतील. मग तो तेथेच मरेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्याच्यावर आपले जाळे टाकीन म्हणजे तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन; पण तो देश त्याला दिसणार नाही व तो तेथेच मरेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो माझ्या पाशात अकडला जाईल; मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात आणेन, पण तो त्याला दिसणार नाही, तो तिथे मरून जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी आपली जाळी त्यांच्यावर टाकीन आणि तो माझ्या फंद्यात पकडला जाईल; मग मी त्यांना बाबेलात खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन, पण ती भूमी ते बघणार नाही त्यामध्ये त्यांचा अंत होईल.