Ezekiel 12:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पण मी काही लोकांना जिवंत राहू देईन. ते रोगराईने वा उपासमारीने अथवा तलवारीने मरणार नाहीत. त्यांनी माझ्याविरुद्ध ज्या भयंकर गोष्टी केल्या, त्या इतरांना ह्या लोकांनी सांगाव्या, म्हणून मी त्यांना जिवंत ठेवीन. मग मीच परमेश्वर आहे हे समजेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी त्यांच्यापैकी थोडक्या लोकांना तलवार, दुष्काळ व मरी ह्यांपासून मी वाचवीन; म्हणजे ते ज्या ज्या राष्ट्रांत जातील तेथे आपल्या अमंगळ कृत्यांची कहाणी सांगतील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्यांच्यापैकी काहीं लोकांना तलवार, दुष्काळ व मरी यांच्यापासून वाचवेन, यासाठी की ज्या देशांत ते जातील तिथे त्यांची अमंगळ कृत्ये कबूल करतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण त्यांच्यातील काही लोकांस तलवारीने, दुष्काळाने, आणि साथीच्या रोगाने पांगवेन, ज्या भूमीत मी त्यांना घेऊन गेलो तेथे त्यांनी त्यांच्या घृणास्पद गोष्टीची नोंद केलेली असेल, म्हणून त्यांना कळेल मी परमेश्वर देव आहे.