Ezekiel 12:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सामान्य माणसांना तू हे सांगितले पाहिजेस ‘यरुशलेममध्ये व इस्राएलच्या इतर भागांत राहणाऱ्या लोकांना परमेश्वर, आमचा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो. खाता-पिताना तुम्ही काळजीने व भयाने पछाडले जाल. का? कारण तुमच्या देशातील सर्व गोष्टींचा नाश होईल. तेथे राहणाऱ्या सर्वांशी शत्रू अत्यंत क्रूरपणे वागेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ह्या देशाच्या लोकांना सांग की, प्रभू परमेश्वर इस्राएल देशातल्या यरुशलेमनिवासीयांविषयी म्हणतो की, ते चिंतातुर होऊन अन्न खातील, भयचकित होऊन पाणी पितील; कारण त्या देशाच्या सर्व रहिवाशांच्या दुष्टतेमुळे त्या भूमीतले सर्वकाही नष्ट करून ती ओसाड करण्यात आली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
देशातील लोकांना सांग: ‘इस्राएल व यरुशलेमात राहणार्‍यांविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते त्यांचे अन्न चिंतेने खातील व आपले पाणी घाबरत पितील, कारण त्यात राहणार्‍या लोकांच्या क्रूरतेमुळे त्यांच्या देशात असलेले सर्वकाही काढून टाकले जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या भूमीतील लोकांस सांग, प्रभू परमेश्वर हे यरूशलेम रहिवाशासंबंधी सांगतोय; इस्राएल निवासी तुम्ही आपली भाकर थरथर कापत खाल व पाणी प्याल आजपावोत तुमची भूमी लुटली जाईल कारण जे त्या ठिकाणी राहतात, त्यांच्या हिंसेमुळे हे घडेल.