Ezekiel 12:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मानवपुत्रा, तू बंडखोर लोकांच्यात राहतोस. ते नेहमीच माझ्याविरुध्द जातात. मी त्यांच्याकरिता केलेल्या गोष्टी पाहण्यासाठी त्यांना डोळे आहेत. पण ते त्यांचा उपयोग करीत नाहीत. (ते ह्या गोष्टी पाहातच नाहीत.) मी करायला सागितलेल्या गोष्टी ऐकण्यासाठी त्यांना कान आहेत, पण ते माझ्या आज्ञा ऐकत नाहीत. का? कारण ते बंडखोर आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मानवपुत्रा, तू फितुरी घराण्यात राहत आहेस, त्यांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही; कारण ते फितुरी घराण्यातले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे मानवपुत्रा, तू बंडखोर लोकांमध्ये राहत आहेस. पाहण्यासाठी त्यांना डोळे आहेत परंतु ते पाहत नाहीत, ऐकण्यासाठी त्यांना कान आहेत परंतु ते ऐकत नाहीत, कारण ते बंडखोर लोक आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मानवाच्या मुला, तू या बंडखोर घराण्याच्या लोकात राहतो, जेथे त्यांच्याकडे बघण्याचे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत, आणि त्यांच्याकडे कान आहेत पण ते ऐकू शकत नाही, कारण ते बंडखोर घराणे आहेत.