Ezekiel 12:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परमेश्वर, त्यांचा प्रभू, हे गीत बंद करील’ असे त्यांना सांग. ह्या पुढे ते इस्राएलबद्दल असे काही म्हणणार नाहीत. त्याऐवजी ते पुढील गीत म्हणतील. ‘लवकरच संकटे येतील दृष्टान्त खरे ठरतील.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर त्यांना सांग: ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, मी ह्या म्हणीचा प्रचार बंद करीन व ती ते इस्राएलात पुन्हा उच्चारणार नाहीत.’ त्यांना सांग की दिवस जवळ आले आहेत व प्रत्येक दृष्टान्त प्रत्ययास येण्याचा समय जवळ आला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, या म्हणीचा मी शेवट करणार आहे आणि ते इस्राएलमध्ये पुन्हा तिचा उच्चार करणार नाहीत.’ त्यांना सांग, ‘प्रत्येक दृष्टान्ताची पूर्तता होण्याचे दिवस जवळ येत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव त्यांना सांग परमेश्वर प्रभू देव असे म्हणतो, मी या म्हणीला संपुष्टात आणिन यासाठी की इस्राएलात याचा पुन्हा कोणी वापर करणार नाही. “मग त्यांना जाहीर कर, दिवस जवळ येत आहेत सर्व बोलके होतील”