Ezekiel 12:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
का? कारण मी परमेश्वर आहे. माझ्या मनाप्रमाणे मी सांगतो व तेच घडेल. मी त्यास विलंब होऊ देणार नाही. संकटे वेगाने येत आहेत. तुमच्याच आयुष्यात ती येतील. बंडखोरांनो, मी जे म्हणतो, ते घडवून आणतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मी परमेश्वर आहे; मी बोलत आहे व मी बोलतो ते वचन सिद्धीस जाईलच, त्याला इतःपर विलंब लागणार नाही; कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, हे फितुरी घराण्या, मी तुमच्या दिवसांत वचन बोलेन व ते पूर्ण करीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु मी याहवेह, मला जे वाटते ते बोलेन आणि विलंब न करता ते पूर्ण होईल. कारण अहो बंडखोर लोकहो, तुमच्या याच दिवसात, मी जे बोलेन ते पूर्ण करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी परमेश्वर देव आहे आणि मी बोलत आहे. मी बोललेले शब्द पूर्ण करेन. आता येथे उशिर होणार नाही. हे परमेश्वर देव बंडखोर घराण्याला जाहीर करतो की, मी बोललेले शब्द पूर्ण करतो.